मजुरांना डांबूनबळजबरीने कामे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जळगाव जिल्ह्यातील खडके बुद्रुक येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील २० मजुरांना सहा महिन्यांपासून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना अन्न-पाण्यावाचून ठेवून बळजबरीने ऊसतोड आणि शेतीची कामे करून घेण्यात आली. या प्रकरणी रणजित पवार आणि राजेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांचे मोबाईल काढून संपर्क तोडण्यात आला होता.

forced labor of workers in khadke budruk shocking incident in jalna traps 20 workers

जळगाव : जिल्ह्यातील खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथे मध्य प्रदेशातील लहान मुलांसह २० मजुरांना सहा महिन्यांपासून डांबून ठेवून बळजबरीने ऊसतोड व शेतीची कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी रणजित पवार आणि राजेश पवार (दोघेही रा. खडके बुद्रुक) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार गोरेलाल रामसिंग बारेला (वय ३०, रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२५ पासून मजुरांना अन्न-पाण्यावाचून ठेवण्यात आले. त्यांचे मोबाइल काढून घेऊन बाहेरील संपर्क तोडण्यात आला.