धुळे : शासकीय जमिनीतील अनियमितताप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सहा तलाठी आणि एका मंडळाधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच सेवानिवृत्त दोन मंडळाधिकारी व तीन तलाठ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
निलंबित तलाठ्यांमध्ये महेश गावित, बाळू धनगर (दुधाळे), ए. बी. कोकणी (पातोंडा), संजय रणयेवले (नंदुरबार/पातोंडा), शिवाजी यादव (चौपाळे), हरीष पाटील (रनाळे) आणि मंडळाधिकारी प्रशांत देवरे (रनाळे)यांचा समावेश आहे. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अहवालानुसार ही कारवाई झाली.





