मिलिंद हर्डीकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मिलिंद हर्डीकर यांची 'द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया'च्या राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ते 'वेलस्पन समूहा'त 'ग्रुप स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज'चे संचालक आहेत. हर्डीकर आता उद्योग क्षेत्रातील संवादाला चालना देतील. धोरणात्मक मुद्द्यांवर मांडणी करतील. गुंतवणूक, नवकल्पना आणि आर्थिक वाढीसाठी 'असोचेम'च्या प्रयत्नांचे नेतृत्व करतील. राज्याच्या विकासाला बळ देण्यासाठी सरकार आणि नवउद्यमींसोबत समन्वय साधतील.

मिलिंद हर्डीकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’च्या ( असोचेम ) राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग, धोरणात्मक उपक्रम आणि विकासाशी निगडित क्षेत्रांशी ते संबंधित आहेत.

हर्डीकर सध्या ‘वेलस्पन समूहा’त ‘ग्रुप स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मागील दशकात राज्याने १० टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक सरासरी वाढ दर नोंदवला. दरडोई जीएसडीपी सध्याच्या किमतीनुसार ३,६१,००० रुपयांपेक्षा अधिक असण्याचा अंदाज असून, यावरून उत्पन्नवाढ; तसेच उद्योग, सेवा आणि गुंतवणूक आधारित वाढीचा वेग कायम असल्याचे दिसून येते,’ असेही हर्डीकर यांनी नमूद केले. नियुक्तीनंतर ते आता उद्योग क्षेत्रातील संवादाला चालना देणे, धोरणात्मक मुद्द्यांवर मांडणी करणे आणि गुंतवणूक, नवकल्पना; तसेच आर्थिक वाढ वेगाने साध्य करण्यासाठी ‘असोचेम’च्या प्रयत्नांचे नेतृत्व करतील. राज्याच्या विकासाला बळ देण्यासाठी सरकार, आणि नवउद्यमी यांच्यासोबत समन्वयाने काम करतील.