मिटेवानीत नागपूरच्या बुकींना अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूरच्या दोन बुकींना मिटेवानी येथे आयपीएल सामन्यांवर सट्टा लावताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराच्या नोंदी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने केली.

nagpur bookies arrested while betting on ipl cricket

भंडारा : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या नागपूरच्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री रंगेहाथ अटक केली. तुमसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिटेवानी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १० लाख ५६ हजार ५४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विक्रम उर्फ विक्की प्रभाकर टेंभरे (२८) रा. पुनापूर घाट, पारडी (नागपूर) आणि रजत घोतमारे (३५) रा. मानकरवाडी, पारडी (नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर सौदा करीत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या कारवाईत पोलिसांनी तीन मोबाइल, रोख रक्कम, जुगाराच्या नोंदी हस्तगत केल्या आहेत.