नाशिकचा ‘बीव्हीजे’वर विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्हा महिला संघाने बीव्हीजे क्लबवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कर्णधार प्रियांका घोडकेने गोलंदाजीत सहा बळी घेतले. तेजस्विनी बाटवालने फलंदाजीत अर्धशतक केले. नाशिकने प्रथम फलंदाजी करत १८७ धावा केल्या. या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

नाशिकचा ‘बीव्हीजे’वर विजय

नाशिक : पुणे येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ‘ इन्व्हिटेशन सुपर लीग ’ स्पर्धेत नाशिक जिल्हा महिला संघाने ‘बीव्हीजे’ क्लब, पुणे यांच्यावर ९७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात नाशिकतर्फे गोलंदाजीत कर्णधार प्रियांका घोडकेने सहा बळी घेतले, तर फलंदाजीत तेजस्विनी बाटवालने अर्धशतक झळकवत विजयात प्रमुख वाटा उचलला.

नाशिकने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर तेजस्विनी बाटवालच्या ५२ धावांच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या.