इंदापूर : भरधाव टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदापूर येथे तरुणाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात निमगाव केतकी (ता. इंदापूर) हद्दीत व्याहाळी रस्त्यावर घडला. गणेश सतीश बिबे (वय २०, रा. गोतंडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ज्ञानदेव अशोक भोंग (वय २८, रा. निमगाव केतकी) हा या अपघातात जखमी झाला. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात चालक नीलेश नंदकुमार तांदळकर (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याचा मित्र दुचाकीवरून व्याहाळीकडे जात असताना अशोक लेलँड कंपनीच्या भरधाव टेम्पोने (एमएच४२ बीयू १५३३) गणेशच्या मोटारसायकलला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानदेव जखमी झाला.





