चालकाच्या रीलच्या नादात बस उलटली

महाराष्ट्र टाइम्स

समृद्धी महामार्गावर चालकाने रील बनवल्याने बस उलटली. या भीषण अपघातात एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक आणि वाहक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हा अपघात मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ झाला.

bus overturned due to drivers distraction on samruddhi highway tragic accident results in 1 childs death and 17 injured

समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स चालवित असताना चालक आणि वाहक रील बनवू लागले. याच सुमारास उतारावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या भीषण अपघातात एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू तर १७ प्रवासी जखमी झाले. मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रील बनवून सर्वांचा जीव धोक्यात घालणारे चालक, वाहक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाले.

पीयूष यशपाल राठोड (वय २) असे मृत बालकाचे नाव आहे. पनवेल येथून एमएच २९बीई ३२३३ क्रमांकाची ट्रॅव्हल्स रात्री समृद्धी महामार्गाने नागपूरकडे निघाली होती. रविवारी पहाटे तीन वाजता ट्रॅव्हल्सचा चालक बदलला. हा चालक गाडी चालवित असताना मोबाइलवर गाणे लावून रील बनवित होता. वाहकदेखील त्याच्या सुरात सूर मिळवून रील बनवत होता. पावणेसहाच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि एकदम ब्रेक मारल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटली. जखमींना मेहकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर अर्धा तास डॉक्टर नसल्याने संताप व्यक्त झाला. अपघातात अस्वद अहमद (११, रा. पुसद), सुशील खडसे, रूपचंद बावनकुळे गंभीर जखमी झाले.