‘महापुरुषांचे विचारसमाजाला दिशा देणारे’

महाराष्ट्र टाइम्स

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी बाराव्या शतकात जातिभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वीरशैव समाजाने आयोजित केलेल्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. अनेक मान्यवर उपस्थित होते.

the thoughts of mahatma basaveshwara guide society

‘ महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातिभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याची दखल आजही जग घेत आहे. अशा महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ते बोलत होते.

या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा, नगरसेवक शुभम धूत, बबनराव गोरे, राजेंद्र बनसोडे, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नगरसेवक राकेश जाधव, राणा चव्हाण आदी उपस्थित होते.