परभणी : सेलू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज, सोमवारी, २० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सेलू शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक) यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उद्घाटक म्हणून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत आणि अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले आहे.








