उष्माघाताने आणखी एकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times

नागपूर : शहरात उष्माघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आणखी एकाचा मृत्यू झाला. उष्माघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता पाच झाली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा मार्गावर सोमवारी रात्री ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख पडलेली नाही. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

उलटलेल्या ट्रकखाली

दबून चालकाचा मृत्यू

नागपूर : उलटलेल्या ट्रकखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. विवेक भीमराव ठाकरे (वय २४, रा. कोअलिया, ता. मुलताई, जि. बैतुल), असे मृताचे नाव आहे. विवेक हा सोमवारी रात्री सरकीने भरलेला ट्रक घेऊन जबलपूरकडे जात होता. समृद्धी महामार्गावरील समृद्धी सर्कल परिसरात विवेकचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक उलटल्याने त्याखाली दबून विवेकचा मृत्यू झाला.