तिखटामिठाचा चिक

Contributed byरोहिणी इनामदार|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गव्हाच्या चिकापासून बनवलेला तिखट चिक आईच्या हातची आठवण करून देतो. हा पौष्टिक पदार्थ उन्हाळ्यात आवर्जून केला जायचा. आता आईकडून शिकलेली ही कृती सर्वांना आवडते. गव्हाचा चिक, डाळीचे पीठ, मोहरी, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता वापरून हा चटकदार पदार्थ बनवला जातो. कोथिंबीर घालून पाच मिनिटे मुरल्यावर गरमागरम सर्व्ह केला जातो.

तिखटामिठाचा चिक

न्हाळा सुरू झाला, की गव्हाच्या चिकाची व त्याचबरोबर आईची आठवण येते. आई तिखट चिक खूप छान करायची. तो पौष्टिक असल्यानं उन्हाळ्यात तीन-चार वेळा तरी व्हायचाच! आईकडून मीही शिकले आणि सर्व जण आवडीनं खातात, म्हणजे आईसारखा जमत असावा.

तिखट चिकाची कृती पुढीलप्रमाणे : गव्हाचा आणि कुरडईसाठी करतो, तो चिक एक वाटी, त्यात पाव वाटी डाळीचं पीठ घालावं व ते चांगलं एकत्र करावं. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालून सरसरीत करावं. मग कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची व कढीपत्ता टाकावा. त्या नंतर चिकाच्या मिश्रणाच्या तिप्पट पाणी घालावं. त्यात चवीनुसार मीठ घालावं व पाण्याला उकळी आल्यावर चिकाचं मिश्रण त्यात टाकावं. एकसारखे हलवून दहा मिनिटं चांगलं शिजल्यावर त्यात भरपूर कोथिंबीर घालावी. एक वाफ आल्यावर गॅस बंद करावा व झाकण ठेवून पाच मिनिटं मुरू द्यावं; गरम गरम सर्व्ह करावं, चटकदार पौष्टिक तिखट चिक तयार!

तिखटामिठाचा चिक