(पान एकवरून)
स्पष्ट केले. या वेळी उमेदवार सुनेत्रा पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच आजी माजी आमदार, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
शरद पवार मतदानापासून दूर
प्रकृती अस्वास्थामुळे पोटनिवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी ‘एक्स’ द्वारे दिली. गेली ५८ वर्षे सातत्याने मी मतदान करत असून प्रथमच ते शक्य होणार नाही, असे नमूद करत आमच्या पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला असून अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजली आहे. बारामतीतील सर्व मतदारांनीही त्यांना मतदान करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.







