धीरेंद्र शास्त्रींविरोधात रोष

महाराष्ट्र टाइम्स

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महाराजांच्या पराक्रमाबद्दल केलेल्या दाव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शास्त्रींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

धीरेंद्र शास्त्रींविरोधात रोष
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल शास्त्रींनी केलेल्या दाव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. इतिहासाची मोडतोड करून चुकीची माहिती पसरवणे हे राज्याच्या अस्मितेचा अपमान असल्याचे मत सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

जामठा येथील भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धांनी आणि संघर्षांनी थकले होते. ते एकदा समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला आणि म्हणाले की, आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही, हे राज्य तुम्हीच सांभाळा. जेव्हा महाराजांनी राज्य सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा समर्थांनी त्यांना विचारले की, ‘शिष्याचे कर्तव्य काय’. त्यावर महाराजांनी आज्ञा पाळणे असे उत्तर दिले. त्यानंतर समर्थांनी तो मुकुट पुन्हा महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितले की, ‘राज्य माझे असेल, पण ते चालवण्याची जबाबदारी तुझी असेल.’ त्यांच्या या वक्तव्यावर आता टीकेची झोड उठत आहे.

या दाव्यामुळे इतिहासाचा चुकीचा संदर्भ दिला गेल्याची भावना निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.’ नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले म्हणाले,‘स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवणारेच जर महाराजांबद्दल चुकीचे विधान करत असतील, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांनी आयुष्यभर देव, देश आणि धर्मासाठी संघर्ष केला आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांसारख्या बलाढ्य सत्तांना नमवून स्वराज्य उभे केले. हा जाज्वल्य इतिहास संपूर्ण जगाला ठाऊक असताना, एका सार्वजनिक मंचावरून महाराजांच्या पराक्रमाचा अवमान होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.’ ‘स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल. आहे का हिंमत, असे म्हणत वडेट्टीवारांनी आमदार संजय गायकवाड यांनादेखील आव्हान दिले आहे.