मुंबई : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ आज, रविवारपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
१३ दिवसांच्या म्हणजे, ८ मेपर्यंत चालणाऱ्या या अभ्यासदौऱ्यात हे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया (एसआरए) या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊससंशोधन संस्थेला भेट देणार आहे. दौऱ्यात ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाचे सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह डॉ. अशोक कडलक, डॉ. कपिल सुशीर तसेच डॉ. अशोक जगताप सहभागी आहेत






