भोंदू पकडला; आता भक्तांचा शोध

महाराष्ट्र टाइम्स

संगमनेर येथील राजेंद्र बापू गडगे नावाच्या भोंदू बाबाला पोलिसांनी पकडले आहे. हा बाबा कॅन्सरसारख्या आजारांवर मंत्राने उपचार करत असल्याचा दावा करत होता. त्याच्या आश्रमातून पोलिसांनी दोनशेहून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक लोक मंत्राने बरे झाल्याचे सांगत आहेत. आता पोलीस या भक्तांचा शोध घेत आहेत. गडगे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भोंदू पकडला; आता भक्तांचा शोध
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर मंत्राद्वारे उपचाराचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र बापू गडगे (वडगावपान, ता. संगमनेर) याच्या आश्रमातून पोलिसांनी दोनशेहून अधिक व्हिडीओ जप्त केले आहेत. त्यातील बहुतांश व्हिडीओत स्वत:ला रुग्ण म्हणविणारे लोक आपण मंत्राने बरे झाल्याचे सांगत आहेत. भोंदू पकडला, आता त्याच्या ‘हो’ ला ‘हो’ देऊन माना डोलावणारे हे भक्त कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

भोंदू गडगे सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडे कसून तपास सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी त्याच्या आश्रमाची झडती घेतली. गडगे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, राहाता या ठिकाणी १३ मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.

अंधश्रद्धेच्या आधारे फसवणूक करून गडगे लोकांकडून पैसे उकळायचा. त्याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगावपान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार गवांदे यांनी फिर्याद दिली आहे.