सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीत व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले व त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करून दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. माढा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मनोहर भोसले व विशाल वाघमारे यांच्यातर्फे ॲड. सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी अटक बेकायदा असल्याचा दावा करून कलमे ७ वर्षांखालील असल्याने नोटीस देऊन अटक करायला हवी होती, असा युक्तिवाद केला.






