‘मायस्ट्रो कप’च्या अंतिम सामन्याचा थरार आज

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकमध्ये डॉक्टर, वकील आणि इंजिनीअर्स 'मायस्ट्रो कप' टी-२० स्पर्धेत खेळणार आहेत. शिक्षण आणि करिअरमुळे मागे पडलेली खेळाची आवड पुन्हा जागृत करण्यासाठी हा सामना आयोजित केला आहे. मखमलाबाद येथील क्रीडॅक मैदानावर आज दुपारी १२ वाजता अंतिम सामना रंगणार आहे. डॉ. विकास केंद्रे यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली आहे. या स्पर्धेतून व्यावसायिक खेळाडू एकत्र येत आहेत.

maestro cup thrilling final match

शिक्षण आणि करिअरच्या व्यापात मागे सुटलेली खेळाची आवड पुन्हा जोपासण्यासाठी नाशिकमधील डॉक्टर, वकील आणि इंजिनीअर्स एकत्र आले असून, मखमलाबाद येथील क्रीडॅक मैदानावर ‘ मायस्ट्रो कप ’ सीजन बॉल टी-२० या स्पर्धेचा अंतिम सामना आज (२६ एप्रिल) दुपारी १२ वाजता पार पडणार आहे.

डॉ. विकास केंद्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आहे. या स्पर्धेसाठी ८४ व्यावसायिकांनी अर्ज केले होते. त्यातून लिलाव पद्धतीने प्रत्येकी १४ खेळाडूंचे सहा संघ तयार केले. अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आर्कि. नीलेश चव्हाण यांनी केले आहे.