‘राज्यात मराठी भाषाच चालणार’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी टीका केली आहे. राज ठाकरे १९ वर्षांपासून ही भूमिका मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांची रस्त्यावर येण्याची कृती ढोंग असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मराठी शिकवण्यावर भर दिला पाहिजे असा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठीच चालेल असा इशाराही त्यांनी दिला.

only marathi language will prevail in the state decided by transport minister

पुणे : महाराष्ट्रातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, हीच भूमिका राज ठाकरे १९ वर्षांपासून मांडत आहेत. सत्ताधारी आज रस्त्यावर येत आहेत हे ढोंग आहे. असली स्टंटबाजी करण्याऐवजी त्यांनी मराठी शिकविले पाहिजे,अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी टीका केली. महाराष्ट्रात मराठी भाषाच चालणार, असाही त्यांनी इशारा दिला. मनसेच्या संघटनांच्या बैठका घेण्यासाठी ते पुण्यात आले असता त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.