शिवाजीनगरमध्ये पळवली ‘पीएमपी’

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यातील शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने भरदिवसा पीएमपी बस पळवली. डेंगळे पुलापासून सुरू झालेला हा प्रवास थेट गोपाळ कृष्ण गोखले चौकापर्यंत पोहोचला. पोलिसांनी बसचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे २०१२ च्या संतोष माने प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पीएमपी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

pmp bus stolen in shivajinagar an act of daring and recklessness

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस भरदिवसा एका व्यक्तीने पळविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी शिवाजीनगर व डेक्कन परिसरात घडली. या व्यक्तीने डेंगळे पुलापासून जंगली महाराज रस्त्यामार्गे थेट नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकापर्यंत बस चालविली. हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी बसचा पाठलाग करून व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सन २०१२मधील कुप्रसिद्ध ‘संतोष माने’ प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या असून, ‘पीएमपी’ बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी वीस वर्षीय व्यक्तीविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळच्या डेंगळे पुलावर वाघोली-महापालिका मार्गावर धावणारी बस उभी होती. संबंधित बसचालकाला गाडीची चावी तशीच ठेवून, तो दुसऱ्या फेरीला निघून गेला. त्या वेळी बस पूर्णपणे रिकामी होती. त्याचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीने सायंकाळी पाचच्या सुमारास थेट बसमध्ये शिरून स्टिअरिंगचा ताबा घेतला. त्याने बस सुरू करून वेगाने दामटण्यास सुरुवात केली. गोखले चौकातून बस वळविताना संबंधित व्यक्तीचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर चढली. सिग्नलजवळ बस अडवून पोलिसांनी चालक व्यक्तीला ताब्यात घेतले.