अजगर घरात शिरला, थंड हवा खायला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर जवळील बोरगाव येथे एका घरात अजगर आढळून आला. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी कुलरच्या गारव्याने आकर्षित होऊन हा अजगर घरात शिरला होता. खडसे कुटुंबातील एका महिलेला पलंगाखाली अजगर दिसला. त्यांनी टॉर्च लावून पाहिले असता अजगर गुंडाळी मारलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

terrifying incident of a python entering a home attracted to the cooler for cool air

नागपूर : उन्हाच्या वाढत्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपण कुलरचा आधार घेतो. याच कुलरच्या गारव्याने अजगरालाही आकर्षित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील खडसे कुटुंबाच्या घरात थंड कुलरच्या समोर असणाऱ्या पलंगाखाली हा अजगर विसावला.

तीन दिवसांपूर्वी गुरुवारी किरण खडसे या घरी सकाळी झाडू लावत असताना पलंगाच्या खाली काळी शेपूटसदृश वस्तू हलताना दिसली. टॉर्च लावून तपासले असता अजगर गुंडाळी मारलेल्या अवस्थेत आढळला.