...तर निधी वितरण होणार नाही

महाराष्ट्र टाइम्स

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जलसंधारण विभागाच्या कामांचा आढावा घेतला. पाणलोट क्षेत्र विकास, नाला खोलीकरण, गाळ काढणे यांसारखी कामे प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग प्राधान्याने करावे. याशिवाय पुढील कामांचे प्रस्ताव आणि निधी वितरण होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.

...तर निधी वितरण होणार नाही
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पाणलोट क्षेत्र विकास , नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, बंधारे दुरुस्ती तसेच नवीन संरचना उभारणीसारखी कामे प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग प्राधान्याने करा. त्याशिवाय पुढील कामांचे प्रस्ताव व निधी वितरण होणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी संबंधित यंत्रणांना दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रा. हि. झुरावत, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, तंत्र अधिकारी विजय चौधरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजीव शिंदे, सचिन खंबाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जिल्हा परिषद) रघुनाथ गवळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, सहाय्यक वनसंरक्षक (पश्चिम) प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक (पूर्व) शिवाजी सहाणे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. मृद व जलसंधारण विभागांतर्गत विविध योजनांची कामे प्रशासनामार्फत राबविली जातात. जलसाठा वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीही या योजना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनेचे उद्दिष्ट मुदतीत साध्य करावे, अशी अपेक्षा प्रसाद यांनी व्यक्त करीत विविध योजनांबाबत सूचनाही केल्या.