त्वचाविकार, पोटविकाराचाही त्रास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वाढत्या उष्म्यामुळे त्वचाविकार आणि पोटविकारांचा त्रास वाढला आहे. अंगावर पुरळ, घामोळे, त्वचा लाल होणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अपचन, पोटदुखी, अतिसार आणि ॲसिडिटीमुळे उलट्या होणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

increase in skin and stomach ailments due to heat

वाढत्या उष्म्यामुळे त्वचाविकारांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. ‘अंगावर पुरळ येणे, घामोळे, त्वचा कोरडी किंवा अतिलाल होणे, चट्टे उमटणे, दीर्घकाळ त्वचाविकाराची ही लक्षणे राहतात. वैद्यकीय सल्ला न घेता मलम लावणे, औषधे घेणे टाळायला हवे,’ असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सुहास साळुंखे यांनी सांगितले. तर, लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींमध्ये विविध प्रकारच्या पोटविकारांच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. उष्म्यामुळे अपचन, पोटदुखी, अतिसार यांसह ॲसिडिटीमुळे उलट्या होणे, चक्कर येण्यासह तीव्र डोकेदुखी यांसारखा त्रास वाढलेला दिसतो.