सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला

महाराष्ट्र टाइम्स

मिरा रोडमध्ये एका खासगी रुग्णालयाजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले असून सुब्रतो सेन किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी ३१ वर्षीय जौब अन्सारीला अटक केली आहे. या घटनेचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडूनही सुरू आहे. हल्लेखोर एकटाच राहत असल्याचे समजते.

knife attack on security guards in mira road one seriously injured

मिरा रोडमध्ये दोन सुरक्षारक्षकांवर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात एक जण जबर तर, दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत ३१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याचा राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडूनही तपास केला जात आहे.

मिरा रोडच्या नयानगर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयाच्या इमारतीमागे निवासी इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. येथे सुरक्षेसाठी राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन सोमवारी पहाटे तैनात होते. येथे अज्ञात व्यक्तीने राजकुमार यांच्यावर प्रथम चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी सुब्रतो हे पुढे आले. त्यांच्यावरही त्याने हल्ला केला आणि पळ काढला.

हल्ल्यात राजकुमार हे जबर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नयानगर पोलिसांनी काही वेळातच हल्लेखोर जौब अन्सारीला अटक केली. तो एकटाच मिरा रोडमध्ये राहात असल्याचे कळते.