India To Receive S 400 Next Month Enhancing Air Force Security
‘एस-४००’ पुढील महिन्यात मिळणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारताला रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीची चौथी खेप पुढील महिन्याच्या सुरुवातीला मिळेल. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या प्रणालीमुळे भारतीय हवाई दलाची संरक्षण क्षमता वाढेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये या प्रणालीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या नवीन संचाच्या समावेशाने देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल.
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान अतिशय प्रभावी कामगिरी करणाऱ्या एस-४०० या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीची चौथी खेप भारताला रशियाकडून पुढील महिन्याच्या पूर्वार्धात मिळणार आहे. ‘जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्र प्रणालीच्या चौथ्या संचाच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाची संरक्षण यंत्रणा अधिक बळकट होईल’, असा विश्वास संरक्षण दलातील सूत्रांनी व्यक्त केला.