बाल पुस्तक जत्रा उद्यापासून सुरू

Contributed byमुख्य संयोजक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात उद्यापासून दुसऱ्या बाल पुस्तक जत्रेला सुरुवात होत आहे. ३० एप्रिल ते चार मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुलांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रम, कथा-कविता सत्रे, विज्ञान गप्पा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर मार्गदर्शन उपलब्ध असेल. महापौर मंजूषा नागपुरे यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या जत्रेचे महत्त्व सांगितले.

बाल पुस्तक जत्रा उद्यापासून सुरू

पुणे : उन्हाळी सुटीच्या काळात टीव्ही, मोबाइल, लॅपटॉपच्या स्क्रीनपासून मुलांना दूर नेणे आणि त्यांच्यात वाचनाची, कला, संस्कृतीची गोडी वाढवणे यासाठी ३० एप्रिल ते चार मे दरम्यान दुसऱ्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या जत्रेत मुलांसाठी विविध रंगतदार कार्यक्रम, कथा-कवितांचे सत्र, विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक (एआय) मार्गदर्शन आणि खेळ असतील.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि ‘संवाद, पुणे’ यांच्या वतीने ही जत्रा आयोजिल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे व पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नगरसेविका वासंती जाधव व ‘संवाद’चे सुनील महाजन उपस्थित होते.

या जत्रेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता होईल. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला असेल.

मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने या जत्रेचे आयोजन केल्याचे नागपुरे म्हणाल्या.