‘श्रीयाळशेठ’ उत्सव मंगळवारी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
392nd shri shriyala sheth festival in pune on tuesday
पुणे : पुण्याच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘औटघटकेचा राजा’ श्रीयाळशेठ यांचा ३९२वा वार्षिक उत्सव मंगळवारी (१८ ऑगस्ट) रास्ता पेठेतील श्रीयाळशेठराजा चौक येथे साजरा करण्यात येणार आहे.

शंकराचे अंशरूप मानले जाणारे श्रीयाळशेठराजा हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. औटघटकेचा राजा असूनही त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. बकरे परिवारात श्रींच्या उपासनेची परंपरा ३९२ वर्षे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव सकाळी ११ ते रात्री १०.३० या वेळेत होणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे दुपारी १२.३० वाजता उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘श्री श्रीयाळशेठराजा उत्सव ट्रस्ट’चे प्रमुख विश्वस्त ओंकार बकरे यांनी दिली.