Horrific Attempted Robbery At Police Officers House In Jalgaon
जळगावात पोलिसाच्या घरात लुटीचा प्रयत्न
Contributed by: जळगाव|महाराष्ट्र टाइम्स•
नशिराबाद येथील मुक्तेश्वरनगर परिसरात बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात दोन अज्ञातांनी सशस्त्र लुटीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस नाईक गणेश साहेबराव कोळी हे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, ते नशिराबाद येथे आले होते.
रात्री साडेआठच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. एकाने कोळी यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्याला सुरा लावला, तर दुसऱ्याने रिव्हॉल्वर दाखवत दागिने व रोकड देण्याची धमकी दिली. प्रसंगावधान राखत कोळींनी बाथरूममध्ये कोंडून ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर चावी घेत कारने पसार झाले.जळगाव : जिल्ह्यातील पहान, तारखेडा, लोहतारसह पाचोरा तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांची कापूस खरेदीत सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापारी हरिभाई मोहनलाल ठक्कर, त्याचा मुलगा आणि जावई यश ठक्कर यांच्याविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.