सेंट लुईस : दिव्या देशमुखला केर्न्स कप बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोनेरू हम्पी आठवी आली. जागतिक विजेतेपद लढतीसाठी पात्र ठरलेली रमेशबाबू वैशालीला अखेरच्या फेरीतील पराभवामुळे अखेरच्या क्रमांकावर राहिली. पांढरे मोहरे असलेल्या दिव्याला अॅना मुझिचुकविरुद्ध ४१ चालीनंतर गुण वाटून घेणे भाग पडले. या स्पर्धेतील नऊ फेऱ्यांत दोन विजय, पाच बरोबरी आणि दोन पराभव या कामगिरीसह दिव्याने ४.५ गुण मिळवले. हम्पी आणि वैशालीने एकही लढत जिंकली नाही. सात बरोबरी आणि दोन पराभव यामुळे हम्पीचे ३.५ गुण झाले. वैशालीला चार पराभव आणि पाच बरोबरी ही कामगिरी लवकरात लवकर विसरणेच आवडेल.