उद्योजक प्रकाश रेगेयांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
उद्योजक प्रकाश रेगेयांचे निधन
नाशिक : उद्योजक प्रकाश शंकर रेगे (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्समधून महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर पावडर कोटिंग व्यवसायात त्यांनी ठसा उमटविला. डॉ. वसंत पवार रुग्णालयाच्या निवृत्त विभागप्रमुख डॉ. रेखा रेगे यांचे ते पती होत.