Chief Engineer Vinod Chandrakant Patil Of Mahavitaran Suspended
अधीक्षक अभियंता पाटील निलंबित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जळगाव : महावितरणच्या जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कल्याण येथील कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश जारी केले.
जळगाव मंडळात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे वाढते प्रमाण, ग्राहकांकडील ६७ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आणि वीजचोरीची २,१६९ प्रकरणे समोर आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर आढावा घेण्यात आला. या त्रुटींवर अपेक्षित कारवाई न झाल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय नाशिक परिमंडळ निश्चित करण्यात आले असून, त्यांना दर सोमवार व शुक्रवारी नाशिक येथे हजेरीचे निर्देश दिले.