Kuldeeps Absence Sparks Controversy Saransh Considered For Second Test Against Sri Lanka
कुलदीप ऐवजी सारांश?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या क्रिकेट कसोटीसाठी सारांश जैन आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला निवडायचे, हा निर्णय पूर्णपणे सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,’ असे मत श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रसेल अर्नाल्ड यांनी व्यक्त केले. आज, शुक्रवारी सरावाच्यावेळी खेळपट्टी पाहिल्यानंतरच भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
भारताने गॉल येथील पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली. यात कुलदीपला एकच विकेट मिळाली. पहिल्या डावात त्याने १४ षटकांत ६५ धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात ११ षटकांत ३८ धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कुलदीपला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या ऐवजी ३३ वर्षीय सारांशला कसोटी पदार्पणाची संधी अपेक्षित आहे.‘श्रीलंकेच्या डावखुऱ्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑफ-स्पिनरची संघात गरज आहे. परंतु हा निर्णय सरावानंतरच घेणे योग्य होईल. खेळपट्टी कोरडी असेल, तर सारांश हा उत्तम पर्याय ठरू शकतो. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल आणि प्रत्येक सत्रागणिक गोलंदाजांना अनुकुल होणार असेल तर कुलदीपची फिरकी आणि चातुर्य आवश्यक ठरेल,’ असे अर्नाल्ड म्हणाले.