ध्वजवंदनातून सूट मागितल्याने निषेध

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
bjps strong protest against minister seeking exemption from flag hoisting
कर्नाटकचे मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी स्वातंत्र्यदिनी विजयनगर येथे राष्ट्रीय ध्वज फडकावण्याच्या जबाबदारीतून सूट मागितल्यानंतर राज्य सरकारने ही जबाबदारी मंत्री के. एस. बसवंतप्पा यांच्याकडे सोपवली.

ध्वजवंदनाच्या जबाबदारीतून सूट मागणारे मंत्री खान यांना भाजपने तीव्र विरोध केला आणि त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली. नंतर भाजप सदस्यांनी या प्रकरणातील सरकारची भूमिका ‘लज्जास्पद’ ठरवत सभात्याग केला.
चामराजपेटचे आमदार असलेल्या खान यांनी वेळेअभावी विजयनगर जिल्ह्याचे प्रभारी मंत्रिपद स्वीकारण्यासही नकार दिला आहे. खान यांनी गुरुवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून या दोन्ही जबाबदाऱ्यांतून सूट मागितली होती. खान यांच्या पत्रानंतर सरकारने यादीत सुधारणा करून विजयनगरमधील स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाची जबाबदारी बसवंतप्पा यांच्याकडे सोपवली. खान आणि बसवंतप्पा या दोघांचाही तीन ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.