भारत दौऱ्याची घाई नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारत दौऱ्याची घाई नाही
बीजिंग : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सीमाप्रश्नावरील भारत-चीन विशेष प्रतिनिधी (एसआर) चर्चेत त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी सोमवारी बीजिंगमध्ये दाखल होणार आहेत. अधिकृत सूत्रांनुसार, डोवाल आणि वांग यांच्यात मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची २५ वी फेरी होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठीच्या बहुप्रतीक्षित भारत दौऱ्यापूर्वी ही चर्चा होत असल्याचे तिला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याची ‘कोणतीही घाई नाही’ आणि भारताशी सकारात्मक संबंध हवे असले तरी राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही’, असे बांगलादेशने स्पष्ट केले असल्याचे ‘बीएसएस’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कोबीर यांनी शनिवारी ढाका येथे हे वक्तव्य केले. ‘द्विपक्षीय चर्चेत पुरेशी प्रगती झाल्यानंतर योग्य वेळी रहमान यांचा भारत दौरा होईल’, असेही या वृत्तातून स्पष्ट झाले आहे. रहमान यांच्या नवी दिल्ली दौर् याबाबत अनिश्चितता कायम असतानाच कोबीर यांचे हे स्पष्टीकरण समोर आले. भारताने बांगलादेशच्या पंतप्रधानांना द्विपक्षीय दौर् यासाठी तसेच १२ आणि १३ सप्टेंबरच्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. ऑगस्ट, २०२४मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून बांगलादेशने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.