Hostel Admission Process For The Academic Year 2026 27 Begins In Nagpur
वसतिगृहांतील प्रवेश सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर: शासकीय वसतिगृहांची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वसतिगृह प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. नागपूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलामुलींसाठी एकूण २५ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १४, तर तालुका स्तरावर ११ वसतिगृहे आहेत.