Tribute Program On The Death Anniversary Of Punyashlok Ahilyadevi Holkar
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : जयताळा परिसरातील एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या छायाचित्राचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शुभांगी कातोरे यांनी विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याची, न्यायप्रियतेची आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. मुख्याध्यापक शरद उरकुडे यांनी विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. निवडक विद्यार्थ्यांनीही त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आयोजनासाठी सुनीता गावंडे, धनश्री ढेगेकर आणि सोनल फुंदे यांनी सहकार्य केले.