350 Activists Including Bipin Gehlot Join Nationalist Congress Sharad Pawar Party In Thane
सामाजिक कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी-शप’मध्ये
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते बिपीन गेहलोत यांच्यासह विविध पक्षांतील सुमारे ३५० कार्यकर्त्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच, १६ महिला बचत गटांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला. गेल्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी ‘शप’मध्ये दाखल झाले होते.
खारटन रोड, ठाणे पूर्व, वागळे इस्टेट आदी भागांत कार्यकर्त्यांचे जाळे बिपीन गेहलोत यांनी विणले आहे. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, पालिकेतील गटनेते अभिजीत पवार, विरू वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.