एन्डोस्कोपिक कॅमेऱ्याने पेपरफुटी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
shocking use of endoscopic camera in paper leak case in chhattisgarh
रायपूर : ‘नीट’ पेपरफुटी आणि त्यानंतरचे आंदोलन गाजत असतानाच छत्तीसगडमध्ये चक्क एन्डोस्कोपिक कॅमेऱ्याचा वापर करून बंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. तपासात दुर्ग जिल्ह्यातील भारती कृषी महाविद्यालयाचा प्राध्यापक योगेश सोनकेसरिया हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सोनकेसरिया याच्यासह पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या बीएससी द्वितीय वर्षाच्या एन्टोमॉलॉजी विषयाच्या परीक्षेबाबत हा प्रकार घडला. २० ऑगस्टला हा पेपर होता.