स्टार्कच्या तुफानासशरीफुलचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
australias stark storm shariful islam provides strong response
मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा डाव ६४ धावांत गुंडाळला; मात्र शरीफुल इस्लामने चांगले प्रत्युत्तर दिले. त्यानेही अर्धा डझन फलंदाज बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेर ८ बाद १६५ या धावसंख्येवर समाधान मानावे लागले. संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : पहिला डाव - सर्व बाद ६४ (शरीफुल इस्लाम १४, स्टार्क ६-१२, कमिन्स ३-२५) वि. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव - ८ बाद १६५ ( स्टीव्ह स्मिथ ४२, कॅमेरुन ग्रीन खेळत आहे ५१, लायन खेळत आहे १०, शरीफुल इस्लाम ६-३५).