Cyber Fraud Against Woman Swindling Of 13 Lakh Rupees
तेरा लाखांची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ’ची गॅस जोडणी खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेस १३ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी कोथरूड येथील ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्या आधारे कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधून, ‘तुमची एमएनजीएलची गॅस जोडणी खंडित करण्यात येणार आहे,’ अशी बतावणी केली. घाबरलेल्या तक्रारदारांच्या मोबाइलवर चोरट्यांनी ‘एपीके फाइल’ पाठवली. त्यानंतर बँक खात्याचा ताबा घेऊन रक्कम चोरली.