Dadar gorakhpur And Dadar balia Trains Regularized Trains In Maharashtra Still Halted
‘यूपी’, बिहार रुळांवर; राज्याला ‘थांबा’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मध्य रेल्वेने मार्ग, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ आणि सह्याद्री एक्स्प्रेस अशा महाराष्ट्रातील गाड्या पुन्हा सुरू करताना मात्र अडचणींचे कारण पुढे केले जात आहे.
गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये, ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दादर-बलिया एक्स्प्रेस १७ ऑगस्टपासून, तर दादर-गोरखपूर एक्स्प्रेस १८ ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. यामुळे उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी दोन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.राज्यातील रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी कोकण विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मार्च २०२३मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रेल्वेगाड्यांच्या मागणीबाबत तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आमदार रवींद्र चव्हाण, खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्री (पान ६वर)