काय सांगतात आकडे ?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
low number of patients treated in statistics alarming situation at lok tilak hospital
मुंबई महानगरपालिकेच्या लो. टिळक रुग्णालयामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ७८,७९८ रुग्ण दाखल झाले. यापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ४,४३१, तर आयुष्मान योजनेअंतर्गत २४६ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत आंतररुग्ण विभागात ४४,०४४ रुग्ण दाखल झाले. यापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ६६० रुग्ण दाखल झाले होते. लो. टिळक रुग्णालयामध्ये योजनेअंतर्गत दाखल रुग्णांची संख्या अत्यल्प आहे.