कडवई स्थानकातही विशेष गाडीला थांबा

महाराष्ट्र टाइम्स
special train stop at kadwai station for ganesh festival
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला रेल्वे प्रशासनाने आणखी एक थांबा मंजूर केला आहे.

विशेष गाडी क्रमांक ०११५३ मुंबई-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मुंबई (०११५४) गाडीला कडवई रेल्वे स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष गाडी रोज धावणार आहे. रत्नागिरीला जाताना ही गाडी कडवई येथे सायंकाळी ६.२३ वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात पहाटे ४.४८ वाजता ही गाडी या स्थानकात थांबणार आहे.