पश्चिम बंगाल हल्लाप्रकरणी आठ अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
eight arrested in bengal attack cjp demands action
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते शेख अब्दुल हफीज यांच्या वडिलांचा हल्ल्यानंतर मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार व्यक्तींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी ‘ सीजेपी ’ने रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या हल्ल्याशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.