फार्मसी महाविद्यालयांना मालकी जागेची अट

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
फार्मसी महाविद्यालयांना मालकी जागेची अट
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आता स्वतःच्या मालकीची जमीन किंवा इमारत असणे बंधनकारक होणार आहे. भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) मान्यतेच्या नियमांमध्ये बदल केला असून, २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून नव्या फार्मसी महाविद्यालयांना ही अट लागू होईल. सध्या भाड्याच्या किंवा भाडेपट्ट्याच्या जागेत सुरू असलेल्या महाविद्यालयांना मात्र स्वतःची कायमस्वरूपी जागा मिळविण्यासाठी सहा वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

भाड्याच्या जागेत महाविद्यालय चालवताना प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, उपकरणांसाठी आवश्यक जागा आणि भविष्यातील विस्तारात अडचणी येतात. भाड्याचा सातत्याने वाढणाऱ्या खर्चामुळे शैक्षणिक विकास आणि संशोधन निधीवर परिणाम होतो. त्यामुळे फार्मसी शिक्षणाचा दर्जा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ‘पीसीआय’ने मालकीच्या जागेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, नव्या महाविद्यालयासाठी अर्ज करणाऱ्या संस्थेकडे मालकीची जमीन किंवा इमारत असणे आवश्यक असेल.