सोरेन, राहुल यांच्या पुतळ्याचे दहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
students burn effigies of sorens rahul gandhi and tejashwi yadav
रांची : झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन , काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांच्या पुतळ्याचे दहन केले; तसेच, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)-काँग्रेस युतीने त्यांच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म्स मंच’च्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा रविवारी २३वा दिवस होता. सत्ताधारी ‘जेएमएम’ आणि काँग्रेसवर त्यांच्या मुद्द्यांवरून राजकारण करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला; तसेच, सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी करत २० ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची घोषणा केली.