Youth Murder In Nashikroad Assailants Fire Gunshots
गोळ्या झाडून युवकाची हत्या
Contributed by: नाशिकरोड|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून सुमित अरुण पगारे या युवकाची हत्या केल्याची घटना नाशिकरोड येथे रविवारी रात्री आठ वाजेदरम्यान बिटको रुग्णालय परिसरातील गोसावीवाडी येथे घडली. पगारे हाही कारागृहातून जामिनावर बाहेर आलेला हेाता.
रविवारी रात्री पगारे एका टपरीजवळ उभा असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.