Historic Victory Of East Bengal Record Broken With 12 0 Win
‘ईस्ट बंगाल’नेरचला इतिहास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कोटा किनाबालू (मलेशिया) : ईस्ट बंगाल एफसीने गुरुवारी येथे झालेल्या ‘ एएफसी महिला चॅम्पियन्स लीग ’ फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यातील सामन्यात रोव्हर्स एफसीचा १२-० असा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह ईस्ट बंगालने पुरुष किंवा महिला अशा कोणत्याही आशियाई स्पर्धेत भारतीय क्लबतर्फे मिळवलेला सर्वांत मोठा विजय नोंदवत इतिहास रचला. त्यांनी १९८५-८६च्या ‘आशियाई क्लब चॅम्पियनशिप’मध्ये ईस्ट बंगालच्या पुरुष संघाने क्लब व्हॅलेन्सिया (मालदीव) विरुद्ध मिळवलेल्या ९-० विजयाचा विक्रम मोडला .
नीरज-रुमेशचा सामनालुझान : श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे आणि भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यातील वाढती स्पर्धा आज, शुक्रवारी येथे होणाऱ्या ‘लुझान डायमंड लीग’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे. ब्रुसेल्स येथे होणाऱ्या ‘डायमंड लीग ग्रँड फिनाले’मधील स्थानासाठी हे दोन्ही खेळाडू आमनेसामने येतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाथिरागेने सुवर्ण, तर चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनी हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
पेगुलाची आगेकूच
मेसन (अमेरिका) : अमेरिकेच्या टॉमी पॉल आणि जेसिका पेगुला यांनी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजय मिळवत आगेकूच केली. पॉलने फ्रेंच ओपन विजेता आणि अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवचा ४-६, ७-६, ६-४ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना फ्लेव्हियो कोबोलीशी होईल. महिला एकेरीत पेगुलाने रुमानियाच्या सोराना कर्स्टियाचा ६-२, ४-६, ७-५ असा पराभव केला.
मेस्सीचा गोल; पण...
चेस्टर (अमेरिका): लिओनेल मेस्सीने एक गोल केला आणि दुसऱ्या गोलला साह्य केले; तरीही इंटर मियामी संघाला फिलाडेल्फिया युनियनविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवावा लागला.
प्रातिती, अक्षयाचे विजय
मुंबई: प्रातिती बोर्दोलोई आणि अक्षया साथी या भारतीय महिला खेळाडूंनी आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेतील महिलांच्या गटात प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत एकूण दहा खेळाडूंनी पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्या आहेत. सन्निधी भट, सरण्या देवी नरहरी, प्रिशिता गुप्ता आणि श्रद्धा बजाज यांचे प्रत्येकी दीड गुण आहेत. १३ खेळाडूंचे प्रत्येकी दोन गुण आहेत.