Indian Hockey Team Maintains Dominance Against Pakistan But Reveals Game Deficiencies
पाकविरुद्ध उणिवाही उघड
Contributed by: ॲमस्टलवीन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व बुधवारीही कायम ठेवले. मात्र, हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्राथमिक साखळी लढतीने भारतीय पुरुष संघाच्या खेळातील उणिवाही स्पष्ट केल्या. कर्णधार हरमनप्रीत सिंगने याची कबुली देताना ‘एक वेळ गोल दवडण्याच्या चुका चालू शकतील; पण बचावातील चुकांचा फटका जास्त बसतो,’ अशी कबुली दिली.
भारतीय संघाने वेगवान सुरुवात करताना ३-० अशी घेतलेली आघाडी सुखावणारी होती. मात्र, जम बसल्यावर पाकने केलेला प्रतिकार आणि त्या वेळी झालेला खेळ भारतीय संघाच्या अव्वल साखळीतील कामगिरीबाबत प्रश्न निर्माण करणारा होता. भारतीय हॉकी संघ पाकविरुद्ध दहा वर्षांत पराभूत झालेला नाही. त्यामुळे निकाल अनपेक्षित नव्हता.