20000 Crore Sugar Scam Question Of Artificial Scarcity
२० हजार कोटींचा साखर घोटाळा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ साठेबाज आणि साखर सम्राटांच्या संगनमताने बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एका आठवड्यात साखरेचे दर २० रुपये प्रति किलोने वाढवून ग्राहकांची लूट सुरू आहे. या संशयास्पद दरवाढीच्या मागे २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून, तत्काळ चौकशी करावी,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
‘देशात मागील दोन वर्षांचे एकूण उत्पादन आणि शिल्लक साठा मिळून ६०० लाख टन साखर उपलब्ध होती. देशांतर्गत वापर ५६० लाख टन वजा केला, तरीही देशात साखरेचा मोठा साठा शिल्लक असायला हवा होता. मात्र, कारखानदार साठा नाही असे सांगत आहेत. देशातील साखर नेमकी कुठे गायब झाली,’ असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.