Indian Team Acknowledges Flaws In Victory Against Pakistan
पाकविरुद्धच्या विजयात उणिवाही उघड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व भारतीय संघाने बुधवारीही कायम ठेवले. मात्र, वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेच्या प्राथमिक साखळी लढतीने भारतीय संघाच्या खेळातील उणिवाही स्पष्ट केल्या. कर्णधार हरमनप्रीत सिंगने याची कबुली देताना ‘एक वेळ गोल दवडण्याच्या चुका चालू शकतील; पण बचावातील चुकांचा फटका जास्त बसतो,’ अशी कबुली दिली.
भारतीय संघाने वेगवान सुरुवात करताना ३-० अशी घेतलेली आघाडी सुखावणारी होती. मात्र, पाकनेप् रतिकार सुरू केल्यावर झालेला खेळ भारतीय संघाच्या कामगिरीबाबत शंका निर्माण करीत होता.‘ बचावातील चुका भारतीय संघास भोवत आहेत. २५ मीटर क्षेत्रात चेंडूचा ताबा मिळवल्यानंतर राखणे महत्त्वाचे आहे. त्या वेळी मूर्खासारख्या चुका होत आहेत. विश्रांतीनंतर संथ सुरुवातीच्या चुका पाकिस्तानविरुद्धही झाल्या. त्यातून शिकण्याची नितांत गरज आहे,’ असे हरमनने सुनावले.